राजकारन - मराठी कविता
असा कसा रे राजकारन्या
लाज कोयुन तु पेला l
तुये थेरं पाहुन वाटते
मले मेल्याहुन मेला ll
कमरेचे काळुन तुनं
तुया डोक्याले बांधलं l
असं वागनं बरं नाई
जरा वाग तु चांगलं ll
जात सांगुन तुइ तुनं
खरी जात दाखोली l
म्हनुन मायाकडुन तुले
हे घे शिव्याची वाखोली ll
जे आमाले समजते
तुले कसं समजत नाई l
का समजुन बी तुले
समजुनच घ्याचं नाई ll
काल होता एक बाप
आज हाय तुया दुसरा l
लाज शरम सोळुन
असते चेहरा तुया हासरा ll
Comments
Post a Comment